LIVE
मुंबई

मुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत रॉकेट फटाक्यांवर बंदी, आग रोखण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

मुंबईत फटाक्यांमुळे होणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने रॉकेट उडवण्यावर २५ नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
मुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत रॉकेट फटाक्यांवर बंदी, आग रोखण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

मुंबईत दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. थेट आकाशात उडणाऱ्या रॉकेट फटाक्यांवर २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती, उंच इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये आगीचे संभाव्य धोके टाळण्यासाठी हा खबरदारीचा उपाय मुंबई महापालिकेने योजला आहे.

रॉकेट उडवल्यानंतर त्याचे जळते अवशेष खिडक्या, बाल्कनी किंवा इमारतींच्या छतावर पडून आग लागण्याच्या अनेक घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक तसेच खासगी जागा, निवासी इमारती, टेरेस, वाहनतळ आणि झोपडपट्टी भागात हे फटाके उडवण्यास मनाई आहे. ९ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबर रोजी रात १२ वाजेपर्यंत हा नियम लागू राहील.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस उपायुक्त, पालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन दलावर देण्यात आली आहे. महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. इतर फटाके फोडताना न्यायालयाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर फटाके फोडण्यास बंदी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी लहान मुलांवर लक्ष ठेवावे आणि फटाके फोडताना जवळ पाण्याचा साठा ठेवावा, असा सल्ला देण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांनी घाबरून न जाता अग्निशमन दलाच्या १०१ किंवा पालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे.

TAGS: #मुंबई #रॉकेट फटाके बंदी #बीएमसी #पालिका #मुंबई आग #फटाके नियम #दिवाळी
Share करा:

संबंधित बातम्या

ठाण्यातील १७ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीतून ५० रहिवाशांची सुटका, हवेत उडवणाऱ्या फटाक्यांवर बंदी

1 दिवसांपूर्वी

कल्याण आणि डोंबिवली शहरात लक्ष्मीपूजनाच्या सात तासात घडल्या ७० आगीच्या धक्कादायक घटना

1 दिवसांपूर्वी

दिवाळीच्या काळात महामुंबईत फटाक्यांमुळे आगीचे तांडव; दोन दिवसांत ४०८ ठिकाणी लागली आग

2 दिवसांपूर्वी

मुंबईतील वडाळा भागात BEST बस चालकाचे सुटले नियंत्रण, दोन कारला धडकून ६ जण जखमी

2 दिवसांपूर्वी
📱 WHATSAPP वर मिळवा
दर तासाला ताज्या बातम्या
Join करा →