LIVE
मुंबई

दिवाळीच्या काळात महामुंबईत फटाक्यांमुळे आगीचे तांडव; दोन दिवसांत ४०८ ठिकाणी लागली आग

दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात तब्बल ४०८ ठिकाणी आगी लागल्या. यात एका सुरक्षारकाचा मृत्यू झाला असून काही रहिवासी जखमी झाले आहेत.
दिवाळीच्या काळात महामुंबईत फटाक्यांमुळे आगीचे तांडव; दोन दिवसांत ४०८ ठिकाणी लागली आग

दिवाळी साजरी करत असताना झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे महामुंबईच्या भागात दोन दिवसांत ४०८ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई शहरामध्ये १४२ ठिकाणी आग लागली असून त्यातील १३७ आगी फटाक्यांमुळे लागल्याचे समोर आले आहे. याशिवाय मीरा-भाईंदर भागात ११०, कल्याण-डोंबिवलीत ७०, भिवंडीत १२ आणि नवी मुंबईत ७४ घटनांची नोंद झाली. बहुतांश दुर्घटना हवेतील रॉकेट आणि फटाक्यांमुळे घडल्याची माहिती समोर आली आहे.

अंधेरी पश्चिमेतील रुनवाल टॉवरमध्ये ७ नोव्हेंबरच्या रातच्या वेळी लागलेल्या आगीमुळे ५६ वर्षीय सुरक्षा रक्षक धनपत महातू यांचा लिफ्टमध्ये धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. घाटकोपर येथील एका इमारतीत लागलेल्या आगीत ३ जण जखमी झाले आहेत. कांदिवली, गोरेगाव, दादर आणि डोंगरी भागातील दुकाने, चाळी तसेच इमारतींच्या भागांचे आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ठाण्यातील रहेजा कार्लाइन इमारतीत लागलेल्या भीषण आगीतून ५० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या सर्व घटनांनंतर मुंबई महापालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पूर्वतयारीवर तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उंच इमारतींमधील सुरक्षा यंत्रणा, अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक फटाक्यांच्या विक्रीवर योग्य नियंत्रण ठेवले गेले नाही असा आरोप होत आहे. नागरिकांनी फटाके फोडताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर किंवा महापालिकेच्या १९१६ या नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. सणांच्या काळात होणाऱ्या अशा अपघातांना रोखण्यासाठी येत्या काळात सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

TAGS: #मुंबई आग #दिवाळी फटाके #अग्निशमन दल #मुंबई बातमी #अपघात
Share करा:

संबंधित बातम्या

ठाण्यातील १७ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीतून ५० रहिवाशांची सुटका, हवेत उडवणाऱ्या फटाक्यांवर बंदी

1 दिवसांपूर्वी

कल्याण आणि डोंबिवली शहरात लक्ष्मीपूजनाच्या सात तासात घडल्या ७० आगीच्या धक्कादायक घटना

1 दिवसांपूर्वी

मुंबईतील वडाळा भागात BEST बस चालकाचे सुटले नियंत्रण, दोन कारला धडकून ६ जण जखमी

2 दिवसांपूर्वी

मुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत रॉकेट फटाक्यांवर बंदी, आग रोखण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

2 दिवसांपूर्वी
📱 WHATSAPP वर मिळवा
दर तासाला ताज्या बातम्या
Join करा →